रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (07:47 IST)

हळद व्यापाऱ्याने आणखी १२ शेतकऱ्यांची १२ लाख ८३ हजार ८९७ रुपयांची फसवणूक

fraud
सातारा तालुक्यातील ११ शेतकऱ्यांना ३२ लाखांना गंडा घालणाऱ्या सांगलीच्या हळद व्यापाऱ्याने वार्इ तालुक्यातील जांब या गावातील आणखी १२ शेतकऱ्यांची १२ लाख ८३ हजार ८९७ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भुर्इंज पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
 
राजकुमार रमेशचंद्र सारडा (मूळ रा. महावीर नगर, गुजराथी हायस्कूल जवळ सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या हळद व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीचा हळद व्यापारी राजकुमार सारडा याने सातारा तालुक्यातील मर्ढे येथील ११ शेतकऱ्यांची तब्बल ३२ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला  असतानाच आता जांबच्या शेतकऱ्यांनीही भुर्इंज पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.