रविवार, 29 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (20:57 IST)

खोके भरून पैसे कोणाकडे गेले ते सुद्धा एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेला कळेल : केसरकर

Deepak Vasant Kesarkar
बुलढाणा येथील चिखली येथे उद्धव ठाकरे बोलत असतानाच गुवाहाटीतून शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी दीपक केसरकर म्हणाले, खोके खोके म्ह्णून तुम्ही कोणाला चिडवता असे म्हणत दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे. ज्यांनी स्वतःचे जीवन वेचले, ज्यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले त्यांची बदनामी केली जात आहे.एक दिवस या सर्व आमदारांचा संयम सुटेल तेव्हा कळेल की खोके कोणाकडे गेले. आणि खोके भरून पैसे कोणाकडे गेले ते सुद्धा एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेला कळेल आणि फ्रीजचा बॉक्स भरून कोणाकडे काय गेले हे देखील सांगू, असेही दीपक केसरकर म्हणाले.
 
तुमची माणसं सगळ्यांची बदनामी करत महाराष्ट्रभर फिरत आहेत, बदनामी सहन करण्याची सुद्धा एक मर्यादा असते. पण जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाईल तेव्हा आम्ही सुद्धा बोलायला लागू, तुमचा आदर करतो म्हणून आम्ही काही बोलत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा असे दीपक केसरकर म्हणाले. 
Edited by : Ratnadeep Ranshoor