रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 8 डिसेंबर 2024 (11:33 IST)

पुणे-मुंबई महामार्गावर अनियंत्रित ट्रेलर थेट फूड मॉलमध्ये एकाचा मृत्यु

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे एका अनियंत्रित ट्रेलरने भरधाव वेगात फूड मॉलमध्ये प्रवेश केला. या अपघातात एकाचा मृत्यूही झाला आहे. अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय ट्रेलरच्या धडकेने अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये ट्रेलर न थांबता थेट फूड मॉलमध्ये घुसल्याचे दिसून येते. या व्हिडिओमध्ये ट्रेलर समोरून एका व्यक्तीला धडकला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. याठिकाणी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बांधण्यात आलेल्या फूड मॉलमध्ये प्रवासी थांबून जेवत असताना अचानक भरधाव वेगात मोठा कंटेनर असलेला हा ट्रेलर मॉलबाहेर उभ्या असलेल्या तीन वाहनांना धडकला आणि थेट फूड मॉलमध्ये घुसला. या दुर्घटनेमुळे या मॉलच्या आत बांधलेली 5 छोटी-मोठी रेस्टॉरंटची मोड़तोड़ झाली आहे. यावेळी फूड मॉलमध्ये उपस्थित प्रवाशांना आपला जीव कसा वाचवायचा हे समजत नव्हते.

या अनियंत्रित ट्रेलर खाली आल्याने फूड मॉलमध्ये काम करणाऱ्या इंद्रदेव पासवान या १९ वर्षीय कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत लहान मुलांसह सुमारे 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रेलर क्रेनच्या साहाय्याने फूड मॉलच्या बाहेर काढण्यात आला.

या अपघाताची माहिती मिळताच अपघात बचाव पथक आणि महामार्ग पेट्रोलिंग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ब्रेक फेल झाल्याने ट्रेलर नियंत्रणाबाहेर गेल्याचे पोलिसांनी सांगितले.खापोली पोलिसांनी ट्रेलर चालकला ताब्यात घेतले आहे 
Edited By - Priya Dixit