शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 मे 2023 (07:59 IST)

मुंबई- गोवा महामार्गाची एक लेन डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची एक लेन डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लांजा येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
 
मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कोकण दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी ३० मे रोजी सिंधुदुर्गकडून रत्नागिरीकडे परतत असताना ते लांजा शहरातील कोत्रे हॉटेल समोर काही काळ थांबले होते. यावेळी लांजा भाजपाच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
 
यावेळी पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की डिसेंबर २०२३ पर्यंत महामार्गाच्या एक लेनचे काम पूर्णत्वास जाईल. त्याचप्रमाणे महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी ब्रिज आहेत. त्यांची कामे तेथील परिस्थितीतील या ब्रिजची कामे लवकरच पूर्णत्वास जातील असे त्यांनी सांगितले. याबरोबरच भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्विस रोडचे काम देखील पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रांत कार्यालयाचे अधिकाऱ्यांना याबाबत हे काम तातडीने मार्गी लावा अशा सूचना केल्या.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor