सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (11:29 IST)

जीवघेणा ऑनलाइन अभ्यास, बारावीतील मुलीची आत्महत्या

ऑनलाइन अभ्यासात अडचणी येत असल्यामुळे बारावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मुंजवाड गावात ही घटना घडली.  
 
रेवती संजय बच्छाव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थींचे नाव आहे. ती सटाणा महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थी आहे. घरची परिस्थिती बेताचीच. घरात एकच मोबाईल आणि शिकणारी तीन भावंडे. त्यातच रेवतीचे बारावीचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असत. त्यामुळे ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल मिळत नसल्याने आपला अभ्यास अपूर्ण राहील, या भीतीपोटी तिने आत्महत्या केली. 
 
रेवतीचे आई-वडील दोघेही मजुरी करतात. त्यामुळे तीन पाल्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी ते मोबाईल पुरवू शकत नाही. रेवतीने विषारी औषध घेवून आपले जीवन संपवले. सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आहे.