रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (07:50 IST)

शरद पवारांचा एकेरी उल्लेख भाजप आमदार राम सातपूते यांच्याकडून माफी

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु असताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजप- शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी राम सातपुते यांना उद्देश्शून केलेल्या विधानामुळे आमदार राम सातपुते यांचा राग अनावर येऊन त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे विरोधकांनी याचा निषेध करून सातपुते यांना माफी मागायला लावली.
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सामान्य़ांचे रोजगार, महागाई इत्यादी विषय भाजप बाजूला ठेऊन इतर मुद्यांकडे लक्ष विचलित करत असल्याचे सागंताना म्हणाले, “सनातन धर्माचे रक्षण करण्याचे आमचे कर्तव्य असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. भाजपाला सनातन धर्म परत आणायचा आहे का?” असे म्हणून त्यांनी भाजपला प्रश्न विचारला.
 
आव्हाड यांनी राम सातपुते यांना उद्देशून म्हटले की “माळशिरस हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे तो राखीव झाला. त म्हणूनच तुम्ही इथे आलात. तिथे सनातन धर्माचे राज्य असते तर तुम्हाला त्या मतदारसंघात चाकरी करावी लागली असती.तुम्हा आमदार म्हणून निवडून आला नसता.”
 
जितेंद्र आव्हाड यांच्य या वक्तव्यामूळे भाजप आमदार राम सातपुते यांचा पारा अनावर झाला. सभागृहात बोलताना ते म्हणाले, “मी दलित असल्याचा मला अभिमान असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मला आरक्षण दिल्यामुळेच मी विधानसभेत आमदार आहे. त्याचा मला अभिमान असून मला आरक्षण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांनी दिलेले नाही. मी सनातन हिंदू धर्माचा असल्याचा मला अभिमान आहे.” असे वक्तव्य राम सातपूते यांनी केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor