गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (07:34 IST)

बसवराज बोम्मई यांना माफी मागायला भाग पाडू

sharad pawar
सीमाप्रश्नाचे पडसाद लोकसभेतही उमटल्याचे पाहायला मिळाले. यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल. हे प्रकरण येत्या ४८ तासांत संपले नाही, तर मला बेळगावात जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, शरद पवारकर्नाटकात गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने जाऊ आणि बसवराज बोम्मई यांना माफी मागायला भाग पाडू, असा इशारा देण्यात आले आहे. 
 
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावादाचा प्रश्न आता शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहनांची कर्नाटकमध्ये तोडफोड करण्यात आली, असे खडसे यांनी म्हटले आहे. कन्नडिगांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वाद उफाळून आणला असल्याने दोन्ही राज्यातील सामाजिक वातावरण बिघडले, असा आरोपही खडसे यांनी केला. 
Edited by : Ratnadeep Ranshoor