शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2020 (11:16 IST)

मुंबईत १ हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू दडवले गेले?

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमध्ये आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सुमारे एक हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे
 
रूग्णालयाबाहेर झालेले पण विविध प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले सुमारे 1000 मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखविण्यात आलेले नाहीत. आकडेवारीची अचूकता हाच कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार असल्याने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
 
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या एका पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मुंबईत ज्या रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही दाखविण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे, अशांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान 1000 मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही.