शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 29 जानेवारी 2023 (12:56 IST)

Osmanabad: डोक्यात ऑक्सिजन सिलिंडर पडून 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

death
काळ कधी कुठून येईल हे सांगता येणं कठीण आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी शहरातून मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. डोक्यात ऑक्सिजनचे सिलिंडर पडून 9 वर्षाच्या एका चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आर्यन अमर नलवडे असे या मयत मुलाचे नाव आहे. 

वृत्तानुसार, आर्यन हा वाशी येथे एका खासगी रुग्णालयाच्या समोर खेळत असताना तिथे ठेवलेले ऑक्सिजनचे सिलेंडर आर्यनचा डोक्यात पडले आणि त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर आला आहे. या घटनेमुळे मृत मुलाचा नातेवाईकांनी रुग्णालयाचा व्यवस्थापकावर बेजाबदारपणासाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास तयार नसून मुलाच्या मृत्यूमुळे परिसरातील वातावरण तापले आहे. 
 
Edited By - Priya Dixit