1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (13:47 IST)

बैलाच्या हल्ल्यात मालकाचा मृत्यू

death
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पिसई वजरवाडी इथं एका घटनेत विठोबा सखाराम घोले (वय 65) यांच्यावर त्यांच्याच बैलाने हल्ला केल्याने मृत्यू झाल्याची बातमी आहे. याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
विठोबा घोले हे दापोलीहून पिसईला गेल्यावर त्यांचा बैल गावातील नदी नाल्यात असल्याचे कळल्यावर ते बैलाला कोंडवाड्यात कोंडण्यासाठी गेले असता त्यांच्या बैलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद दापोली स्थानकात नोंद झाली आहे.
 
घरी न जाता परस्पर बैलाला कोंडवाड्यात कोंडण्यासाठी गेले मात्र ते परतलेच नाही त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध केली मात्र सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्याला, मानेला आणि छातीवर जखमा असल्याने बैलाने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला असा अंदाज वर्तविला जात आहे.
 
या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात नोंद केली गेली असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.