शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 मार्च 2018 (09:31 IST)

पंढरपूर : विठ्ठलासाठी सोन्याच्या विटा बनवणार

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जमा झालेल्या सोन्यापासून विटा बनवण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी देवस्थाननं घेतला आहे. सध्या देवस्थानाकडे ३५ किलो सोनं आहे. हे सोनं वितळवून त्याच्या विटा बनवण्यात येणार आहेत. याबाबत नित्योपचार समिती आणि भाविकांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.

विठ्ठल आणि रुक्मिणीला पुरातन काळापासून दान म्हणून अनेक दागिने मिळाले आहेत. हे दागिने जुने झाल्यामुळे सतत मोजणं आणि हाताळणं अवघड झालं आहे. सध्या मंदिराकडे नित्योपचाराचे सोडून ३५ किलो सोनं आहे. हे सोनं वितळवून त्यापासून विटा बनवण्यात येणार आहेत आणि या विटा सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.