शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (09:28 IST)

पंढरपुर : विठ्ठल दर्शनासाठी आता टोकन पद्धत

पंढरपुरातील विठ्ठलाचेही टोकन पद्धतीने दर्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या टोकनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन आणि मंदिर परिसरात टोकन देणारे स्टॉल समिती उभारणार आहे. मंदिर समितीच्या या निर्णयामुळे भाविकांची या त्रासातून मुक्तता होणार आहे. येत्या कार्तिकी वारीपासून याची सुरूवात केली जाणार आहे.

मंदिर समितीने घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयामुळे भाविकांना विठुरायाचे दर्शन घेणे सुलभ जाणार आहे. या टोकन दर्शन व्यवस्थेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार असल्याने यासाठी समिती अथवा भाविकांना आर्थिक झळ बसणार नाही. याशिवाय भाविकाला पंढरपुरात आल्यावर आपल्या दर्शनाची नक्की वेळ समजणार आहे.