गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (10:14 IST)

पंढरपूर तीन दिवसांसाठी बंद

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर शहरात 3 दिवस बंदचे आवाहन करण्यात आले आहे. 22 एप्रिल ते 24 एप्रिल म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे तीन दिवस शहरातील सर्व दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. 
 
सोलापूर शहरात करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या नगराध्यक्षांनी आवाहन केले आहे. दरम्यान पंढरपूर तालुक्यात सोमवारपर्यंत एकही करोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा असेही त्यांनी आवाहन केले आहे.
 
या दरम्यान मेडिकल व हॉस्पिटल सोडून इतर सर्व दुकाने बंद राहतील. या तीन दिवसांत अत्यावश्यक सेवेतील दुध विक्री सेवा सकाळी 7 ते 9 या वेळेतच सुरु राहतील. या दरम्यान फळे व भाजीपाला विक्री देखील बंद राहणार असून तीन दिवस कोणत्याही नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.