सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (13:11 IST)

सोलापूरसाठी 10 एप्रिलला उजनीतून पाणी सोडणार

एकीकडे कोरोना विषाणूच संकटाला जनता सामोरे जात असताना दुसरीकडे औज बंधारा कोरडा पडून शहरावर पाणीटंचाईची शक्यता  निर्माण झाली आहे. मात्र महापालिकेच्या मागणीनुसार येत्या 10 एप्रिलला उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.

शहराला उजनी-सोलापूर आणि टाकळी-सोलापूर या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, भीमा नदीवरील औज बंधारा सध्या पाण्याअभावी कोरडा पडला असून टाकळी व चिंचपूर बंधार्‍याजवळ उपलब्ध असलेल्या पाण्यावर शहरवासियांची तहान भागत आहे. आगामी जलसंकट ओळखून महापालिकेने जलसंपदा विभागाकडे उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार येत्या 10 एप्रिलला उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन केल्याचे उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. 8 हजार क्युसेक या वेगाने पाणी सोडून 18 एप्रिलपर्यंत टाकळीला पाणी पोहोचेल, असे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

जलसंपदा विभागाने 10 एप्रिलला पाणी सोडणांर असल्याचे सांगितले. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकर पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.