बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: लातूर , शुक्रवार, 27 मार्च 2020 (13:29 IST)

लातूरला मिळणार आता सात दिवसाला पाणी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेवरुन महानगरपालिकेच्यावतीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शहराला आता 10 ऐवजी 7 दिवसाला पाणी मिळणार आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
शहराला पाणीपुरवठा होणार्यात केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात जलसाठाझालाच नव्हता. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठे पाऊस झाले नसल्याने पावसाळ्यात प्रकल्पाची पाणीपातळी वाढली नाही. परतीचा पाऊस धावून आला, मांजरा धरणातील मृत जलसाठ्याची पाणीपातळी वाढली. परंतु जीवंत पातळीपर्यंत आली नाही. यामुळे उपलब्ध पाणी पावसाळ्यापर्यंत पुरविता यावे यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले होते. त्यानुसार 10 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, सध्या उन्हाळा आणि त्यात कोरोनाचा धोका हे लक्षात घेता पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आता 7 दिवसाला पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत.