आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सकाळी चहा पिण्याऐवजी जि-याच्या पाण्याचे सेवन करा
सर्वसाधारणपणे जिरं पोटाचे विकार, गॅस, एसिडीटी यांसारख्या अनेक आजारांवर फायदेशीर ठरते हे आपल्या सर्वांना माहित असेलच. मात्र याच जि-याचं पाणी रोज सकाळी उठल्यानंतर प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी का प्यावं?
1. दररोज सकाळी जर एक ग्लास जिऱ्याचं पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात कॉपर, मँगनीज, मिनरल्स मिळतात.
2. जिऱ्याच्या पाण्यात कॅलरीज खूप कमी असतात, एक चमचा जिऱ्यामध्ये ७ कॅलरी असतात
3. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी तर जिऱ्याचं पाणी अधिक फायदेशीर ठरू शकतं.
4. जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पोटासंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळेल
कसं तयार कराल जिऱ्याचं पाणी?
एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरं टाका आणि रात्रभर ठेवा. शक्यतो तांब्याच्या भांड्यात हे पाणी ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या.
अशा पद्धतीने जि-याचं पाणी प्यायल्याने शरीराला खूपच फायदेशीर ठरेल. हे पाणी प्यायल्याने तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल जेणेकरुन तुम्ही दिवसभर छान सक्रिय राहाल.