शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जानेवारी 2020 (14:19 IST)

सकाळी उठल्या उठल्या मोबाइल वापरणे घातक

मोबाइल हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. माणसाला प्रत्येक गोष्टीची अपडेट ही मोबाइलच्या मार्फत मिळते. सकाळी उठल्या उठल्या माणूस स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी मोबाइल हातात घेतो. अशा लोकांची सध्या संख्या वाढत चालली आहे. परंतु दिवसभर या वाईट सवयीमुळे तणाव जाणवतो हेदेखील लक्षात येत असेल. एका संशोधनात अलीकडे असं स्पष्ट झाले आहे की, जे लोक सकाळी उठल्या उठल्या हातात मोबाइल घेतात त्यांना दिवसभर सुरळीत काम करणं कठीण जातं.
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा सकाळी उठल्यावर आपण मोबाइलमध्ये नोटिफिकेशन बघतो, तेव्हा आपल्या मेंदू त्या विषयावर विचार करू लागतो. त्यामुळे मन इतर कामात लागत नाही, असं केल्यानं  आपल्या कार्यक्षमतेवरदेखील प्रभाव पडतो.
 
सकाळी उठल्यावर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल कळतं मग ती स्वतःशी निगडित असो वा नसो. मग आपण सतत त्याबद्दल विचार करू लागतो. तेव्हा तणाव निर्माण होतो. सकाळी अनेक लोकांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं असेदेखील म्हटलं गेले आहे. अशात अधिक तणावामुळे त्यात भर पडते. यामुळे गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं. 
 
सकाळी उठल्यावर जेव्हा आपण ईमेल किंवा नोटिफिकेशन तपासत असतो तेव्हा आपण मागील दिवसांच्या गोष्टी वाचत असतो. ज्यामुळे वर्तामान विसरून भूतकाळात जगू लागतो. यामुळे आपलं मन आणि मेंदू वर्तमान स्थितीत मन लावण्यात अपयशी ठरतं. ज्यामुळे दिवसाची सुरुवातच योग्यरीत्या होत नाही.
 
तज्ज्ञांप्रमाणे सकाळी उठल्यावर फोन वापरणं टाळावं. आपण सकाळी उठल्यावर मेडिटेशन किंवा योगादेखील करू शकता. हे केल्यामुळे मन आणि मेंदूला शांतता लाभेल. ज्यामुळे आपण कार्य चांगल्यारीत्या पार पाडू शकाल.