सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:38 IST)

भागवत कराडांच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न; पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण

bhagwat karad
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुका आणि आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरुन राज्यात वातावरण तापलं आहे. पंकजा मुंडे यांना यंदाही संधी न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले असून, वेगवेगळ्या माध्यामातून ते संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पंकजा मुंडे समर्थकांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यापरिसरात मोठा गोंधळ निर्माण झालं. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी कराड समर्थकांनी पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण केल्याचं पाहायला मिळालं.
 
संध्याकाळच्या सुमारास पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भागवत कराड यांच्या कार्यालयाजवळ दगडफेकेचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने समर्थक आक्रमक झाले असून, अनेक ठिकाणी मुंडे समर्थकांनी संताप व्यक्त केला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या कार्यालयावर दगडफेकिचा प्रयत्न झाला. यावेळी तिथे उपस्थित असलेले कराड समर्थक सुद्धा संतापले आणि त्यांनी मुंडे समर्थकांना मारहाण केली.
 
दरम्यान, या मारहाणीची सर्व दृश्य रेकॉर्ड झाली असून, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या कार्यालयाला छावणीचं स्वरूप आलं आहे.