1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जुलै 2025 (13:04 IST)

पूर्णियाचे खासदार ​​पप्पू यादव यांनी राज ठाकरेंना दिले खुले आव्हान

Pappu Yadav
महाराष्ट्रातील मराठी भाषेचा वाद शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्यानंतर हा मुद्दा आणखी तापला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध हिंदी भाषा वाद शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्यानंतर हा मुद्दा आणखी तापला आहे. आता पूर्णियाचे खासदार राजेश रंजन उर्फ ​​पप्पू यादव यांनीही या भाषेच्या वादात उडी घेतली आहे. पप्पू यादव यांनी थेट राज ठाकरेंना आपल्या रडारवर घेतले आहे आणि महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल त्यांना इशारा दिला आहे. या प्रकरणावर त्यांनी शुक्रवारी सांगितले की, राज ठाकरे यांचे लोक महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला करत आहे, मी राज ठाकरेंना आव्हान दिले आहे की ही गुंडगिरी थांबवा, अन्यथा मी मुंबईत येऊन त्यांचा सर्व अहंकार बाहेर काढेन.  
पूर्णियाचे खासदार पप्पू यादव पुढे म्हणाले की, आज पत्रकार परिषदेत मी चुकून उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. ते म्हणाले की मी त्यांचा मनापासून आदर करतो. मी भाजपच्या इशाऱ्यावर राज ठाकरेंना गुंडगिरी करू देणार नाही. प्रत्येक राज्यातील प्रादेशिकतेचा आदर केला जातो, परंतु जर त्यांनी या नावाखाली बिहारमधील लोकांवर हल्ला केला तर आम्ही त्यांचा पाया हादरवू. असे देखील पप्पू यादव म्हणाले.

Edited By- Dhanashri Naik