शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (17:02 IST)

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ! सिन्नरमधील बनावट कागदपत्रांद्वारे जमीन खरेदी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय असलेले संजय पुनमिया यांनी सिन्नर तालुक्यात महामार्गालगत जमिनींच्या खरेदीसाठी बनावट सातबाराचे उतारे सादर करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार निबंधक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी पुनमिया यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय असलेले संजय पुनमिया यांनी बनावट कागदपत्रांद्वारे जमिनी खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. तपास करताना त्यांनी जोडलेला सातबाराचा उतारा बनावट असल्याचे पुढे आले. उपनिबंधकांच्या तक्रारीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात पुनमिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान २००७ साली पुनमिया यांनी सिन्नर तालुक्यात महामार्गालगत जमिनींच्या खरेदीसाठी बनावट सातबाराचे उतारे सादर करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार निबंधक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी पुनमिया यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुनमिया यांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी मुंबई पोलिसांशी संपर्क केला आहे. न्यायालयीन कोठडी संपताच त्यांना नाशिक पोलिसांच्या हवाली करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुनमिया यांच्या वकिलाकडून न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी व गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेत तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
परमबीर सिंह यांचा निकटवर्ती असलेल्या पुनमियाविरुद्ध दाखल झालेला हा बारावा गुन्हा आहे. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध मुंबईमधील विविध पोलीस ठाण्यांत खंडणी वसुलीसाठी धमकावणे, खंडणी गोळा करणे, फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.