1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2018 (09:56 IST)

अचानकपणे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील फायर अलार्म वाजला

पुन्हा एकदा मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील फायर अलार्म अचानक वाजू लागल्याने पोलिस अधिकारी तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. दुपारी साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता आग किंवा शॉट सर्किटचा प्रकार नसून तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. त्यामुळे  मंत्रालयातील फायर अलार्मने देखील पोलिस आणि अग्निशमन दलाचे लक्ष वेधून घेतली. जून २०१२ मध्ये मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याला आग लागली होती. यात तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये जळून खाक झाली होती. तसेच तीन जनसंपर्क अधिकाऱ्यांसह १४ जण गंभीर जखमी झाले होते.