शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जानेवारी 2018 (09:01 IST)

राज्यातील वाहनसंख्येत १८ लाखांहून अधिक वाढ

vehicle increase in last year

राज्यातील एकूण वाहनसंख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ लाखांहून अधिक वाहनांची भर पडली असून ती तब्बल तीन कोटी दोन लाखांवर गेली आहे. नवीन वाहनांच्या नोंदणीत सातत्याने पुणे आणि त्या खालोखाल ठाणे क्षेत्र आघाडीवर आहे. पुणे क्षेत्रात तीन लाखांहून अधिक तर ठाणे क्षेत्रात दोन लाख २९ हजाराहून अधिक नवीन वाहनांची नोंद झाली आहे.

राज्यात एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये एकूण वाहनांची संख्या ३,०२,२६,८४७ एवढी होती. मात्र यात नव्या १८ लाख ५५ हजार नव्या वाहनांची भर पडली असून ही संख्या एप्रिल २०१७ ते नोव्हेंबर २०१७ दरम्यान ३,२०,८१,८७५ वर गेली आहे. मार्च महिन्यापर्यंत आणखी काही वाहनांची यात भर पडेल, असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.