जाती-जातीमध्ये भेद-संघर्ष करणे पवारांचा उद्योग : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. त्यांना तो रोखता आला नाही. ते भाजपवर आरोप करत आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणात आम्ही खूप काही बोलू शकतो. जातिजाती मध्ये भेद-संघर्ष करणे हा त्यांचा उद्योग आहे. असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते कोल्हापूर पत्रकार परिषदेत बोलत होते.
दंगल झाल्यावर पवार यांनी 8 वाजता पत्रकार परिषद घेऊन मिलिंद एकबोटे व भिडे गुरुजींचे नाव घेतात. म्हणजेच प्रत्येक गोष्टीला जातीय रंग द्यायचा, आता काय झालं ज्यामुळे संभाजी भिडे गुरुजींचे नाव त्यातून काढावे लागले. असेही पाटील म्हणाले.
प्रत्येक संघर्ष हे दोन जातीमध्ये नेऊन ठेवायचा आणि त्यांना भिडवायचे. तेच आयुष्यभर केलं, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार? असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.