शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 मार्च 2022 (09:46 IST)

आरोग्य केंद्रात डॉक्टरकडून चपराश्याला मारहाण

भंडारा- डॉक्टरने प्राथमिक आरोग्य केंद्रातील चपराश्याला गळा आवळून काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 
डॉक्टर कडसकर असे मारहाण करणाऱ्या डॉक्टरचे नाव असून नारायण उईके असे मारहाण झालेल्या चपराश्याचे नाव आहे. कडसकर यांना आरोग्य केंद्राच्या आवारात बेदम मारहाण केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने ही घटना समोर आली आहे.
 
याचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये डॉ. कडस्कर हे शिपायाला आधी काठीने मारहाण करताना दिसतात. त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गळा आवळताना दिसतात. हा व्हिडिओ आरोग्य केंद्रातील एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 
 
डॉक्टरने शिपायाला का मारहाण केली? यामागचे कारण सध्या समजू शकले नाही.