बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जून 2018 (08:51 IST)

मुदत संपली आता प्लास्टिक बंदी होणार २३ जून शेवटची तारीख

प्लास्टिकची पिशवी दिसल्यास तब्बल 5 हजारांचा दंड होणार आहे. या 23 जूनपासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीची कडेकोट अंमलबजावणी होत असून ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी हा दंड 200 रुपयांपर्यंत कमी करण्यात यावा, हा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीने फेटाळला आहे. त्यामुळे आता मुंबईतही प्लास्टिक वापरणाऱ्यांवर 5000 रुपये दंड होणार आहे. दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होणार आहे. यामध्ये प्लास्टिक बंधी ही चहा कप, सरबत ग्लास, थर्माकोल प्लेट, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल, हॉटेलमध्ये पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक (प्लस्टिक डब्बे, चमचे, पिशवी), उत्पादन ठेवण्यासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक असे असून या प्लास्टिकवर कारवाई होणार नाही असे उत्पादनासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक आणि थर्माकोल, हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाईन बॉटल्स, औषधांचे आवरणं असणार आहेत त्या बरोबर प्लस्टिकचे पेन, दुधाच्या पिशव्या (50 मायक्रॉनच्या वर), पावसाळा आहे म्हणून रेनकोट, तर सोबत अन्नधान्य साठवण करण्यासाठी वापरण्यात येणार प्लस्टिक असणार आहे. झाडे लहान वाढवताना नर्सरीमध्ये वापरण्यात येणारं प्लास्टिकचा समावेश आहे.