गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जून 2018 (08:46 IST)

समुद्र किनारी जोडप बुडाल मृतदेह मिळाले, काळजी घ्या

एक जोडपे मुंबई येथील वर्सोव्यात समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेले त्यात बुडाले आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला आहे. जुहू आणि वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर या दोघांचेही मृतदेह सापडले असुन याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाऊस सुरु असतांना असे नागरिक का वागतात हा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. 
 
या दोघांची नावे  सिफा आणि फजल अशी आहेत. साकीनानाका येथे राहणारे होते. बुधवारी सकाळी हे दोघे मित्र मैत्रिण वर्सोवा बीच फिरायला आले जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट होते. मात्र नंतर ते अचानक तिथुन गायब झाले. काही वेळाने मुलाचा मृतदेह जुहू बीचवर सापडला आहे. त्याच्याकडे सापडलेल्या काही कागदपत्रावरून त्याचे नाव फजल असल्याचे पोलिसांना समजले. तर संध्याकाळी सिफाचा मृतदेह वर्सोवा बीचवर सापडला. 'वर्सोवा किनाऱ्यावर बसले असताना त्यांना कदाचित भरतीचा अंदाज आला नसावा. ज्यात हे दोघे बुडाले असावे असा प्राथमिक अंदाज जुहू पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.