बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जून 2018 (17:24 IST)

नागपूरमध्ये होणार पावसाळी अधिवेशन, येत्या 4 जुलैपासून

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 4 जुलै ते 20 जुलै दरम्यान नागपूर येथे होणार असल्याचा निर्णय कामकाज सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला आहे. 13 दिवस कामकाज चालणार आहे. तर चार दिवस सुट्या असणार आहेत.
 
या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने उपराजधानीत तयारी जोरात सुरू आहे. विधानभवन, रविभवन, नागभवन, राजभवन आदी परिसरात साफसफाई, स्वच्छता, सौंदर्यीकरणासह दुरुस्तीच्या कामाला गती आली आहे. सध्या विधानभवन परिसरात डागडुजी सुरू असून थोडीफार रंगरंगोटीही केली जात आहे. परिसरातील खड्डे बुजवणे, डांबरीकरण करणे आदी कामाला गती आली आहे. जूनच्या अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत.