शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नागपूर हादरलं, एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या

BJP worker Kamlakar Pohankar
नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जणांची निर्घृणपणे हत्या केल्याने शहरातील सगळे नागरीक हादरले आहेत. 
 
दिघोरी येथे कमलाकर पवनकर यांच्यासह कुटुंबातील ५ जणांचा खून करण्यात आला आहे. मध्य रात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मृतांमध्ये एका वृद्ध आणि लहान मुलगा व मुलीचाही समावेश आहे. मृतांची नावे कमलाकर पवनकर, पत्नी अर्चना, मुलगी वेदांती, भाचा गणेश आणि आई मीराबाई अशी आहेत. 
 
पवनकर हे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यांचा प्रॉपर्टीचा व्यवसाय असून हत्या संपत्तीच्या वादातून झाला असल्याचा संशय आहे. घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचं निष्पन्न होत नसल्याने ओळखीच्या व्यक्तीने हे कृत्य केलं असल्याची शंका आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.