मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आईने मोबाईल वापरू दिला नाही, केली आत्महत्या

आईने मोबाईल वापरू दिला नाही म्हणून  हरयाणातील झज्जरमध्ये एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. या घटनेत तरुणीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. मधू असं या तरुणीचं नाव असून मोबाईल वापरण्यास मनाई केली म्हणून तिचा आईसोबत वाद झाला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधूचे वडील कर्मवीर सिंह हे माजी सैनिक होते. त्यांच्या रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून तिने आत्महत्या केली. या घटनेमागे कोणाचाही हात नसल्याचही पोलिसांनी म्हटले आहे.

रिव्हॉल्व्हर हे मधूच्या मृतदेहाजवळ सापडलं आहे. मधू बीएससीची विद्यार्थिनी होती. तीन दिवसांपूर्वी ती बराच वेळ फोनवर बोलत असल्याचं तिच्या पालकांनी पाहीलं. त्यानंतर तिच्याकडून मोबाईल पालकांनी ताब्यात घेतला. बुधवारी मधू पुन्हा एकदा मोबाईलचा वापर करताना दिसली. त्यामुळेच आई आणि तिच्यामध्ये यावरून वाद झाला. संतापलेली मधू खोलीत गेली आणि तिने वडिलांच्या रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली.