suvichar

पोकेमन गो च्या शोधात तरुणाला मिळाला तुरुंगवास

सोमवार, 31 ऑक्टोबर 2016 (10:55 IST)
पोकेमन गो खेळण्याच्या नादात चर्चमध्ये घुसलेल्या एका युवकाला तीन महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
रुस्लान सोकोलोव्हस्की या 22 वर्षांच्या युवकाला रशियन न्यायालयाने ही तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. येकातरीनबर्गच्या युराल्स शहरातील ही घटना आहे. पोकोमन गो खेळताना चर्चमध्ये घुसलेल्या रुस्लान सोकोलोव्हस्कीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सन 2012 साली पास करण्यात आलेल्या एका कायद्यान्वये त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेलेआहेत.
 
रुस्लान सोकोलोव्हस्की हा एक निरीश्‍वरवादी-नास्तिक युवक आहे. त्याने आपल्या आयफोनवर पोकोमन गो खेळताना चर्चमध्ये घुसल्याचा व्हिडियो यूट्यूबवर अपलोड केला होता. हा व्हिडियो लाखो लोकांनी पाहिला.
येकातरीनबर्गच्या किर्व्होस्की न्यायालयाने शुक्रवारी रुस्लान सोकोलोव्हस्कीला ‘प्री ट्रायल’ तीन महिने तुरुंगवास सुनावला आहे. जर रुस्लान सोकोलोव्हस्कीवरील आरोप शबीत झाला, तर त्याला पाच वर्षंपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
 
न्यायालयाच्या निर्णयावर मानवी हक्क सल्लागार मंडळाच्या प्रेसिडेंन्शियल कौन्सिलचे प्रमुख मिखाईल फेदोटोव्ह यांनी टीका केली आहे. एको ऑफ मॉस्को रेडियोवर त्यांनी सांगितले, की रुस्लान सोकोलोव्हस्कीला शिक्षा होणे योग्य नाही. आम्नेस्टी इंटरनॅशनलने रुस्लान सोकोलोव्हस्कीला ताबडतोब मुक्‍त करण्याची मागणी केली आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

iPhone 18 Pro Leaks: ४८MP कॅमेरा आणि A20 Pro चिप; लाँचपूर्वीच समोर आले आयफोन १८ प्रो चे फीचर्स!

'लिव्ह-इन रिलेशनशिप'साठी या राज्यातील सरकारचे ५ महत्त्वाचे नियम

उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव, सहा बंडखोर खासदारांबाबत लोकसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाला आव्हान

LIVE: पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी ९१ टक्के भूसंपादन पूर्ण

Maruti Suzuki Brezza Facelift २४ जुलै रोजी लाँच होणार: E20-सुसंगत इंजिनचे दोन पर्याय आणि दमदार वैशिष्ट्ये

पुढील लेख
Show comments