शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2016 (11:05 IST)

पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची वयोमर्यादा वाढवली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. याबाबतची घोषणा नागपूर अधिवेशनात करण्यात आली आहे. यानुसार खुल्या गटातील वयोमर्यादा २८ वरून ३१ तर मागासवर्गीय गटातील वयोमर्यादा ३१ वरून ३४ वर्षे करण्यात आली आहे. पूर्वी या परीक्षेसाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांची वयोमर्यादा २८ तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ३१ होती.