रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (08:54 IST)

आंदोलन करतांना राजू शेट्टी यांना पोलीसांनी कॉलर धरुन खाली पाडले

कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यात माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलीसांनी कॉलर धरुन खाली पाडल्याने एकच गोंधळ उडाला.
 
संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोदी व शहांच्या नावाने शंखध्वनी करत गनिमी काव्याने आणलेल्या पुतळ्याचे दहन केले. मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी, शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणणाऱ्या शेतकऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा सुरु झाल्या. एवढ्यात एक चारचाकी मोर्चेकरीजवळ येऊन थांबली. पोलीसांची नजर चुकवून पिंजरापासून तयार केलेला पुतळा बाहेर काढत असतानाच पोलीसांनी धाव घेतल्याने शेतकरी आणि पोलिसांमध्ये झोेंबाझोंबी सुरु झाली. पुतळा पेटवतील म्हणून पोलिसांनीही लगेच पाण्याच्या बादल्या भरुन मारायला सुरुवात केली. एवढ्यात पुतळा खेचाखेची सुरु असताना पोलीसांनी राजू शेट्टी यांच्या कॉलरवरच हात घेतल्याने शेतकरी कार्यकर्ते अधिकच संतापले.
 
पोलिसांवरच धावून गेल्याने पोलिसांनी रेटारेटी सुरु केली. यात शेट्टी यांची घड्याळही हातातून पडले, चप्पल बाजूला फेकल्या गेल्या. हा प्रकार पाहून अधिक संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पुतळयाचे शिल्लक राहिलेले अवशेष पेटवून दिले. या झटापटीमध्ये अनेकांचे अंगावरचे कपडेही फाटले.