1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 जून 2025 (15:02 IST)

अमरावतीत पोटावर आणि छातीवर वार करून पोलीस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या

murder
अमरावती शहरात एका एएसआय रँक पोलिस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रथम पोलिस अधिकाऱ्याला कारने चिरडले आणि नंतर त्याच्या छातीवर आणि पोटावर शस्त्राने अनेक वार करण्यात आले. 
ही घटना अमरावती शहरातील नवसारीजवळ घडली. मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव अब्दुल कलाम अब्दुल कादिर (54) असे आहे. ते अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वालगाव पोलीस ठाण्यात तैनात होते. काही अज्ञात आरोपींनी रस्ता अपघात घडवून त्यांची निर्घृण हत्या केली.
प्राथमिक तपासात पोलिसांना असे आढळून आले की, आरोपींनी प्रथम अधिकाऱ्याला गाडीने चिरडले आणि नंतर त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्राने अनेक वार केले. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येत 5-6 जणांचा सहभाग होता.
या घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर अमरावतीत खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
भरदिवसा पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येने आता पोलीस सुरक्षित नाही तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न उदभवला आहे. 
Edited By - Priya Dixit