शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (20:50 IST)

बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी केदार दिघेंना पोलिसांनी समन्स पाठवले

kedar dighe
ठाण्यातील शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केदार दिघेंना पोलिसांनी समन्स पाठवले आहेत. बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी केदार यांना समन्स पाठवण्यात आले आहेत. मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हे समन्स पाठवण्यात आले असून त्यामध्ये चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करावं असं सांगण्यात आलंय. केदार यांचे मित्र रोहित कपूर यांच्याविरोधात २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
“आम्ही सध्या रोहित कपूरचा शोध घेत आहोत. याचसंदर्भात दिघेंना समन्स पाठवण्यात आले आहे. दिघे यांच्या कुटुंबियांनी हे समन्स त्यांच्यावतीने स्वीकारलेत. त्यांनी पोलीस तपासात सहकार्य करावं असं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलंय. पोलिसांचं एक पथक या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या कपूरला पकडण्यासाठी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.