शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2024 (14:18 IST)

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये

pm-kisan-samman-nidhi
आज देशभरातील करोडो शेतकरी भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेत आहेत, पंतप्रधान  किसान सन्मान निधी योजना विशेषत: देशातील गरीब जनतेला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे. सरकार दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपयांची आर्थिक मदत पाठवते.

प्रत्येक हप्त्यात 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात.पंतप्रधान किसान योजना मध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 17 वा हफ्ता जमा होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या खात्यात 17 वा हफ्ता 2000 रुपये जून किंवा जुलै मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. 

या योजने अंतर्गत 16 वा हफ्ता फेब्रुवारी मध्ये जमा केला गेला. आता या योजनेतील 17 वा हफ्ता चार महिन्यानंतर म्हणजे जून मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. या साठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम PM किसान पोर्टलला भेट द्यावी लागेल. येथे भेट देऊन तुम्हाला सर्व आवश्यक चरणांचे पालन करावे लागेल. नंतर महत्वाचे कागदपत्रे डाउनलोड करावे लागतील. आवश्यक तपशील भरा. नंतर फॉर्म जमा करा. अशा प्रकारे अर्ज करू शकाल.शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे. असे केले नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. 

 Edited by - Priya Dixit