1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2024 (17:59 IST)

EVM वादावरून प्रफुल्ल पटेल यांचा इलॉन मस्क यांना फुकटचा सल्ला देऊ नका म्हणत हल्लाबोल

इलॉन मस्क याने ईव्हीएम वर केलेल्या वक्तव्यामुळे ईव्हीएम वरील वाद जोरदार होत आहे. पक्ष आणि विरोधक ईव्हीएमवरून राजकारण करत आहे. ईव्हीएम हॅक होण्याची भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी सरकार स्पष्ट असून विरोधकांवर हल्लाबोल करत आहे. 
 
आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया मध्ये विरोधकांवर हल्लाबोल करताना म्हटले की, या निवडणुकीनंतर ईव्हीएम हॅक झाल्याच्या तक्रारी करणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत.

नंतर त्यांनी इलॉन मस्क यांनी केलेल्या ईव्हीएमवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर उत्तर दिले.ते म्हणाले,  इलॉन मस्क यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देऊ नये,त्यांनी वाहने बनवावी. या निवडणुकी नंतर त्यांची तोंडे बंद झाली जे ईव्हीएम हॅक असल्याचे म्हणायचे.

ते पुढे म्हणाले की, विरोधक म्हणतात की माझ्यासाठी फायदेशीर असेल तर मला बरे वाटते, माझे नुकसान झाले तर ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याचे म्हणतात.
 
काय म्हणाले इलॉन मस्क 
इलॉन मस्क यांनी एक ट्विट केले होते. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन रद्द करू, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मानवाकडून किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका जरी कमी असला तरी अजूनही जास्त आहे. यानंतर राहुल गांधींनी हे ट्विट रिट्विट करत लिहिले की, देशातील ईव्हीएम हा एक ‘ब्लॅक बॉक्स’ आहे, ज्याची तपासणी करण्याची कोणालाही परवानगी नाही. आमच्या निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाहीची फसवणूक होते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते.

Edited by - Priya Dixit