मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (16:27 IST)

प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे भोसलेंचा उल्लेख 'बिनडोक' असा केला

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे भोसलेंचा उल्लेख बिनडोक असा केलाय. मराठा आरक्षण मुद्द्यावरुन घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा असल्याचे माझ्या वाचनात नाही. एक राजा तर बिनडोक आहे. संभाजी राजे इतर विषयात जास्त लक्ष देतात अशी टीका त्यांनी केली.
 
मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. उदयनराजेंना भाजपने खासदार कसं बनवलं असा मला प्रश्न पडल्याचे ते म्हणाले. 
 
 मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षण ला धक्का लागता कामा नये असे ते म्हणाले. आरक्षणाच्या विषयाला फाटे फोडण्याच काम सुरू आहे. यातून महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडत असल्याचं चित्र आहे. ते बिघडू नये असे आंबेडकर म्हणाले.