मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (10:07 IST)

करोनामुळे नव्हे तर सर्व मृत्यू नैसर्गिक: प्रकाश आंबेडकर

देशात दररोज हजारोंच्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळून येत असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे देशात ६४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेगळाच दावा केला आहे. आंबेडकर यांच्याप्रमाणे करोनामुळे मृत्यू होत नसून सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत. 
 
करोना आहे, यावरही विश्वास नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं. त्यांनी ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे. 
 
त्यांनी म्हटले की जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू निश्चित आहेच. जर दहा कोटी लोकांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेल. परंतू सध्याच्या परिस्थितीत करोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत.
 
आंबेडकर म्हणाले की करोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा पुरावा काय कारण? कोणाचीही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे का? ज्यात करोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असेल.