मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (19:54 IST)

पूर्व विदर्भात पावसाचा हाहाकार, पुरामुळे गावे पाण्याखाली

विदर्भात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पूर्व विदर्भातील १४८ गावांना पुराचा तडाखा बसला आहे. दरम्यान सुमारे १८ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
 
पूरग्रस्तांसाठी विविध ठिकाणी छावण्या उघडण्यात आल्या आहे. ‘एनडीआरएफ’ची एक, ‘एसीआरएफ’च्या तीन तुकडय़ा आणि लष्कराची बचाव पथके लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम करत आहेत.
 
पूर्व विदर्भात शनिवारपासून पूरस्थिती आहे. नागपूर जिल्ह्य़ातील ५१, गडचिरोली जिल्ह्य़ातील ४, चंद्रपूर जिल्ह्य़ातील ६, भंडाऱ्यातील ५७ आणि गोंदियातील ३० अशा १४८ गावांतील २७,७२१ ग्रामस्थांना पुराचा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही पूरस्थिती असल्यानं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं.
 
गडचिरोलीच्या उत्तर आणि दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात गावांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.