मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (12:59 IST)

नागपुरात सदर भागातील घर कोसळून एक ठार, चार जखमी

सदर भागातील आझाद चौक येथे राहणाऱ्या अशोक टेकसुल्तान यांचे घर सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळले. या ठिकाणी तीन कुटुंबे राहत होती. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी आहेत.
 
सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास हे घर अचानक कोसळले. घर पडत असल्याची जाणीव होताच घरातील मंडळी बाहेरच्या दिशेने धावले. मात्र काहीजण ढिगाºयाखाली दबले गेले. येथील नगरसेवक संजय बंगाले यांच्याकडून ही बातमी पोलीस व प्रशासनाला कळताच मदतकार्य सुरू झाले. यात दबलेल्या चारजणांना बाहेर काढण्यात यश आले तर किशोर टेकसुल्तान (४५) यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.