शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जुलै 2020 (22:31 IST)

पंजाब प्रांतात एक्स्प्रेस रेल्वेगाडी अपघात, १९ यात्रेकरूंचा जागीच मृत्यू

19 Sikh pilgrims returning from Nankana Sahib killed after train accident
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात एका एक्स्प्रेस रेल्वेगाडीनं शीख भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला धडक दिली. या भीषण अपघातात १९ यात्रेकरूंचा जागीच मृत्यू  झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाहोरपासून ६० किमी अंतरावर ही घटना घडली. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.
 
पेशावर येथून २२ शीख भाविक एका मिनी बसमधून नानकाना येथील गुरूद्वारात प्रार्थनेसाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर हे सर्व भाविक परत पेशावरकडे निघाले होते. परतीच्या प्रवासात असताना सच्चा सौदा फारूकाबाद शेखुपुरा येथील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर त्यांच्या मिनी बसला भरधाव एक्स्प्रेस गाडीनं उडवलं.
 
शाह हुसैन एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी कराचीहून लाहोरला जात होती. त्याचवेळी मिनी बस समोर आली. लाहोरपासून ६० किमी अंतरावर ही घटना घडली. यात मिनी बसमधील १९ भाविक जागीच ठार झाले. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.