मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2020 (14:07 IST)

चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा

सध्या जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. या व्हायरची उत्पत्ती चीनमधून झाल्याचा दावाही अनेक देशांकडून करण्यात आला आहे. अशा परिस्थिती चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा धक्कादायक आहे. अमेरिकन सायन्स जर्नल PANS मध्ये प्रकाशित अहवालानुसार हा नवा स्वाईन फ्लू 2009 मध्ये जगभरात पसलेल्या H1N1 चाच जेनेटिकल डिसेंडेंट असून अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
नवा स्वाइन फ्लू अधिक शक्तिशाली असून याने माणूस आजारी होऊ शकतो तसंच कोरोना संसर्गावेळी नव्या स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरला तर गंभीर रुप धारण करण्याची शक्यता चीनच्या वैज्ञानिकांकडून वर्तवली जात आहे. 
 
शोध
नव्या स्वाईन फ्लूला जी 4 असं नाव देण्यात आलं आहे. याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी 2011 ते 2018 या कालावधीत संशोधन केलं. दरम्यान 10 राज्यांमधील 30 हजार डुकरांच्या नाकातून नमूने घेऊन तपासणी केली. यावरून चीनमध्ये 179 प्रकारचे स्वाईन फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांमध्ये जी 4 ला वेगळं करण्यात आलं. 
 
नमुन्यांमध्ये सर्वाधिक डुकरांमध्ये जी 4 स्वाईन फ्लू असल्याचं आढळून आलं. तसंच तो स्वाईन फ्लू या डुकरांमध्ये 2016 पासून असल्याचंही समोर आलं. यानंतर वैज्ञानिकांनी जी 4 वर संशोधन सुरू केला. 
 
धोका
जी 4 हा स्वाईन फ्लू मानवामध्ये वेगानं आणि गंभीरतेनं पसरू शकतो. 
हा व्हायरस मानवी शरीरात अधिक तीव्रतेनं पसरतो. 
हा सीजनल फ्लू असल्यामुळे कोणालाही जी 4 स्वाईन फ्लूपासून इम्युनिटी मिळणार नाही. 
सामान्य फ्लूपासून रक्षण होत असलं तरी जी 4 गंभीर रुप धारण करु शकतो.
 
सध्या हा व्हायरस मानवामध्ये आल्यावर तो एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो का याची मात्र माहिती मिळालेली नाही. सध्या यावर संशोधन सुरू आहे. याचा संसर्ग झाल्यास परिणाम गंभीर होऊ शकतात.