सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2020 (08:29 IST)

ट्रम्प प्रशासनाकडून योगी सरकारचे अनुकरण

सीएएविरोधी आंदोलनातून दिल्ली आणि उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक दंगलीवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगलीत सहभागी नागरिकांची छायाचित्रे मुख्य चौकाचौकात लावली होती आणि त्यांच्याकडून सरकारी संपत्तीचे नुकसान केल्याबद्दल भरपाई वसुलीसाठी नोटिसा पाठवल्या होत्या. योगींची हीच कल्पना आता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनही राबवत आहे. 
 
कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड या नागरिकाच्या हत्येनंतर अमेरिकेत सातत्याने हिंसक आंदोलने, लूट होत आहेत. त्यामुळे आता ट्रम्प प्रशासनाने दंगलीत सहभागी लोकांचे फोटो ट्विटरवरून शेअर करत त्यांच्याविषयी माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
 
सध्या हिंसक आंदोलने थांबली आहेत. त्यानंतर ट्रम्प यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओतून काढलेली एक डझनहून अधिक छायाचित्रे स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करून नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन  केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ट्रम्प सातत्याने अशी छायाचित्रे ट्विट करीत आहेत. दरम्यान, अमेरिकेत लेफायेट्टे पार्क येथे झालेल्या दंगलीतील संशयितांची पोस्टर्सही अनेक ठिकाणी लावण्यात आली आहेत.