शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025 (13:52 IST)

लाडक्या बहिणींचे पैसे भाऊबीजेला जमा होणार

My beloved sister
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाडक्या बहिणींना दिवाळीसाठी आनंदाची बातमी आहे. भाऊबीजेनिमित्त लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून 5500 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे फक्त पात्र  महिलांनाच मिळणार आहे. या साठी मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहे. 
ऑक्टोबरचा दिवाळीपूर्वी आगाऊ हफ्ता तसेच दिवली बोनस ओवाळणी  आणि नोव्हेंबरच हफ्ता असे एकूण 5500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. या साठी दोन अटी केल्या आहे.
ज्या बहिणींना या योजनेच्या पहिल्या हफ्तापासून जून 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंतचे सर्व 15 हफ्ते कोणताही खंड न पडता जमा झाले आहे. त्याच पात्र असतील. त्यांनाच ओवाळणी मिळणार आहे. तसेच ज्या बहिणींचे केवायसी, बँक खाते लिंकिंग पूर्ण असतील आणि त्यांचे अर्ज होल्डवर नसतील त्या पात्र असतील.
Edited By - Priya Dixit