शरद पवार आणि अजित पवार बारामतीत सभेत एकत्र आले
अजित पवार आणि शरद पवार बारामतीत विद्या प्रतिष्ठान शेक्षणिक संस्थेच्या वार्षिक सभेला एकत्र आले. या वेळी अजित पवारांनी विद्या प्रतिष्ठानमधील विकास कामांची पाहणी केली.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मधील व्हीआयटीमध्ये सर्वसाधारण सभा पार पडली आहे. या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून शरद पवार ,विश्वस्त म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार,खजिनदार म्हणून युगेंद्र पवार उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र पाहायला मिळत आहे.शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता परत एकदा एकत्र आले होते.
Edited By - Priya Dixit