बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2020 (08:13 IST)

शिवसेना भवनात तिघांना कोरोना

थेट शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनातच कोरोनाचा शिरकाव झाल्याचं उघड झालं आहे. सेना भवनातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. 
 
रविवारी कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या तिघांवर मुंबईत उपचार सुरू आहेत. शिवसेना भवनचा एक कर्मचारी गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित झाला होता. शिवसेना कार्यालय ३ दिवसांकरता बंद करण्यात येत आहे. संपूर्ण कार्यालय सेनिटाइज करण्यात येत आहे.