मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रांची , रविवार, 28 जून 2020 (08:26 IST)

महेंद्रसिंह धोनी 2 जुलैपासून दिसणार नव्या अवतारात

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 2 जुलैपासूनएका नव्या अवतारात दिसणार आहे. तो आता प्रशिक्षणाकडे वळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डॅरल कुलिननच क्रिकेट अकादमीत धोनी डायरेक्टर ऑफ कोचिंग म्हणून काम पाहणार आहे. 
 
क्रिकेट प्रशिक्षणात रस असलेल्या खेळाडूंना सर्व तांत्रिक गोष्टी समजावून सांगण्यासाठी आमच्या अकादमीत विशेष सोय आहे. आतारपर्यंत 200 पेक्षा जास्त प्रशिक्षक आमच्या अकादमीतून नव्या गोष्टी शिकून गेले आहेत. 2 जुलैपासून आम्ही खेळाडूंसाठी ऑनलाइन कोचिंग सुरू करणार आहोत. 
 
मैदानात त्यांना नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज आहे या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन केले जाईल. या सर्व प्रोजक्टचा प्रमुख धोनी असेल, तो खेळाडूंना मार्गदर्शन करण्यापासून इतर तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घडवण्यात मदत करेल. अकादमीच्या अधिकार्‍यांनी माध्यमांशी  बोलताना ही माहिती दिली.