आषाढी एकादशीला विशेष: उपवासाचे दही वडे झडपट तयार करा
साहित्य : 3 तो 4 कच्ची केळी, 2 चमचे मोरधनाचे पीठ, तूप किंवा शेंगदाण्याचे तेल, मीठ, तिखट, जिरेपूड, मिरेपूड, साखर, सर्व चवीप्रमाणे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं.
कृती : केळी धुवून देठ काढून कुकरमध्ये 1 शिटी घेऊन वाफवा. कुकरमधून काढून थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर सालं काढून किसून घ्या. त्यात 2 चमचे मोरधनाचं पीठ घाला. मीठ, किसलेलं आलं, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालून मळून घ्या. पीठ जास्त सैल करू नये. पेढ्यासारखे गोळे तयार करा.
कढईत शेंगदाण्याचे तेल किंवा तूप आपल्या इच्छेनुसार घालून तापवा. नंतर हे गोळे मध्यम आंचेवर तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या.
दही तयार करण्यासाठी कृती :
एका भांड्यात दही घ्या त्यात काळी मिरीपूड ,जिरेपूड, मीठ, साखर घालून चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. दही घट्ट असल्यास त्यात थोडं दूध घाला. वडे थंड झाल्यावर दह्यामध्ये मिक्स करावे.
एका बाउल मध्ये दहीवडे वर चिंचेची चटणी, आणि इतर साहित्य जसे मिरपूड, जिरेपूड, तिखट, मीठ घाला आपल्या आवडीप्रमाणे घालून सर्व्ह करा.
चिंचेची चटणी करण्यासाठी साहित्य :चिंच, गूळ, उपवासाचे मीठ, जिरेपूड, मिरेपूड.
कृती : चिंच उकळवून घ्यावी. त्यापाण्यात चिंच कोळून पाणी वेगळं करावं. एक भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवून त्यात गूळ घाला. गूळ वितळल्यावर त्यामध्ये चिंचेचं घोळ (पाणी) उकळवायला ठेवा. उकळवताना जिरे पूड, मिरेपूड, मीठ, थोडे बेदाणे आणि खारखेचे तुकडे घालावं. आंबट गोड चिंचेची चटणी तयार.