मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (15:49 IST)

२४ तासांमध्ये ३०३ पोलीस कोरोनाबाधित, ५ पोलीसांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांमध्ये आणखी ३०३ पोलीस कोरोनाबाधित आढळले असून, पाच पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १३ हजार १८० वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ३८९ जण, कोरोनामुक्त झालेले १० हजार ६५५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १३६ जणांचा समावेश आहे. 
 
राज्यातील १३ हजार १८० कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ३८७ अधिकारी व ११ हजार ७९३ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ३८९ पोलिसांमध्ये ३१३ अधिकारी व २ हजार ७६ कर्मचारी आहेत.
 
कोरोनामुक्त झालेल्या १० हजार ६५५ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ६० व ९ हजार ५९५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३६ पोलिसांमध्ये १४ अधिकारी व १२२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.