24 तासात 54 जवान कोरोनाग्रस्त
जगभरात थैमान घालणार्या‘ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढताना दिसत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच संरक्षण क्षेत्रातील जवानांनाही कोरोनाने विळाखा दिला आहे.
मागील 24 तासांमध्ये इंडो तिबेटीन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलातील 18 जवान व बॉर्डर ऑफ सिक्युरटी फोर्स (बीएसएफ)चे आणखी 36 जवान रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या ‘आयटीबीपी'च्या 151 जवानांवर उपचार सुरू आहेत तरआतापर्यंत 270 जवानांनी कोरोनावर मात केलेली आहे. तसेच ‘बीएसएफ'च्या 526 जवानांवर उपचार सुरू असून 33 जवानांनी कोरोनावर मात केली आहे.